पैठणच्या खुल्या कारागृहातील कैद्याची गळफास घेवून आत्महत्या

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : पैठणच्या खुल्या कारागृहातील कैद्याने शुक्रवारी सकाळी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पालघर येथील एका खुनाच्या गुन्ह्यात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.

शांतीलाल तान्ह्या ओझरे ४४ (रा. पालघर) असे या कैद्याचे नाव आहे. २०२३ मध्ये नाशिक कारागृहातून त्याला पैठणच्या खुल्या कारागृहात वर्ग करण्यात आले होते. बंदी सी.५५१३ क्रमांक असलेल्या या कैद्याने कारागृहाच्या मागील मोकळ्या जागेत असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार अन्य कैद्यांनी पाहिला. कारागृह प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.

कारागृह अधीक्षक राजेंद्र निमगडे यांनी पैठण पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. फौजदार संभाजी खाडे व कैद्यांमार्फत केली जाते शेती, दुग्धोत्पादन व गुऱ्हाळ पैठण ते शेवगाव मार्गावर ३० एकर क्षेत्रावर हे जिल्हा खुले कारागृह आहे. महाराष्ट्रातील विविध बंदीस्त कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असताना ज्यांची वर्तणूक चांगली आहे. तसेच १० वर्षांपेक्षा कमी शिक्षा शिल्लक राहिली असेल. अशा कैद्यांना येथे पाठवले जाते.

 या कारागृहातील शेकडो एकर क्षेत्रावर शेती केली जाते. दुधदुभती जनावरे मोठ्या संख्येने आहेत. २५० क्षमतेच्या या कारागृहातील बहुतांश कैद्यातर्फे हि कामे करुन घेतली जातात. याशिवाय ३१० एकरवरील संत ज्ञानेश्वर उद्यानातील गवत काढणे, परिसर स्वच्छ करणे, फाउंटन मधील शेवाळ काढणे, झाडांची निगा राखणे आदी कामासाठी कैद्यांना पाठवले जाते. तसेच हातमाग कापड तयार करण्यात येते. ऊस उत्पादन झाल्यावर गुऱ्हाळ यंत्रणा राबविली जाते. विशेष म्हणजे या सर्व कामांची मजुरी कैद्यांच्या बँकखात्यात जमा केली जाते. उत्पादीत सर्व धान्य, भाजीपाला, दुध, गुळ व हातमाग कापड हे राज्यातील सर्वच कारागृहात रवाना केले जाते.
अजिज शेख हे यावेळी उपस्थित होते.

आज २४ रोजी पैठणच्या शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण पथक रुग्णालय येथे मयत कैद्याच्या कुंटुंबातील सदस्य, न्यायालयाचे न्यायाधीश, महसूल अधिकारी, शासकीय पंच व खुले कारागृहातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पैठण पोलीस पुढील तपास करीत आहेत.